लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! महिन्याला 7000 रुपये मिळवण्याची संधी, केंद्र सरकारची ‘विमा सखी’ योजना काय आहे? Vima Sakhi Yojana for Women.

‘Vima Sakhi Yojana’ for Women महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आणखी एक दमदार पाऊल उचलले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या योजनेचा उद्देश महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हाती पैसे असणे, हा आहे. चला तर, ‘विमा सखी योजना’ काय आहे आणि ती महिलांसाठी कशी फायदेशीर ठरणार आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.Government Launches the ‘Vima Sakhi Yojana’ for Women

WhatsApp Group जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारचे प्रयत्न

महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘विमा सखी’ योजना महिलांसाठी एक नवी संधी घेऊन आली आहे. या योजनेद्वारे महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असून, त्यांच्या आर्थिक मार्ग मोकळा होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते योजनेचा शुभारंभ

आज, 9 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाच्या दौऱ्यावर असताना ‘विमा सखी’ योजनेचा शुभारंभ करणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही केंद्र सरकारची विमा कंपनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी पार पाडणार आहे.

हे पण वाचा :PM Kisan 19th Installment: 19 वा हप्ता कधी मिळेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

योजनेच्या महत्त्वपूर्ण अटी

‘विमा सखी’ योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांसाठी काही अटी ठरवल्या आहेत.

  1. महिलांचे किमान शिक्षण इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  2. अर्ज करणाऱ्या महिलांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण झालेले असावे.

या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना पुढील तीन वर्षांत प्रशिक्षण दिले जाणार असून, या प्रशिक्षण कालावधीत महिलांना स्टायपेंड (महिना मानधन) देण्यात येणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षांचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना एलआयसीमध्ये विमा एजंट म्हणून नोकरी मिळेल. इतकंच नाही, तर पदवीधर महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधीही दिली जाईल.

स्टायपेंड आणि कमिशन

प्रशिक्षणादरम्यान महिलांना महिन्याला स्टायपेंड मिळणार आहे.

  • पहिल्या वर्षी महिलांना दरमहा 7000 रुपये दिले जातील.
  • दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6000 रुपये केली जाईल.
  • तिसऱ्या वर्षी स्टायपेंड 5000 रुपये असेल.

त्याशिवाय, विमा सखीने दिलेले टार्गेट पूर्ण केल्यानंतर तिला कमिशन स्वरूपात अतिरिक्त पैसे मिळतील.

रोजगाराच्या नव्या संधी

‘विमा सखी’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून कामाची संधी दिली जाईल. यानंतरच्या टप्प्यात आणखी 50,000 महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल. तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर महिलांना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा मानस आहे.

महिलांसाठी स्वावलंबी बनण्याची संधी

‘विमा सखी’ योजना केवळ रोजगार मिळवून देण्यापुरती मर्यादित नाही, तर महिलांच्या आर्थिक साक्षरतेलाही चालना देणार आहे. यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नवी दिशा मिळेल.

केंद्र सरकारच्या या योजनेने महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची शक्यता आहे. आता आपल्या घरातील बहिणी, पत्नी, आई किंवा मैत्रिणी या योजनेत सहभागी होऊन आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात. चला तर, ही माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवा आणि त्यांना ‘विमा सखी’ बनण्यासाठी प्रोत्साहन द्या!

‘Vima Sakhi Yojana’:

FeatureDetails
ObjectiveEmpower women financially by providing job opportunities and promoting financial literacy.
Launch DateDecember 9
Launched ByPrime Minister Narendra Modi
Implementing AgencyLife Insurance Corporation of India (LIC)
Eligibility Criteria– Minimum education: 10th pass- Minimum age: 18 years
Training Duration3 years
Stipend During Training– 1st Year: ₹7,000/month- 2nd Year: ₹6,000/month- 3rd Year: ₹5,000/month
Post-Training Opportunities– Job as an LIC Insurance Agent- Graduate women may become Development Officers
CommissionAdditional earnings based on meeting insurance sales targets
Employment Scope– Phase 1: 35,000 women to be employed- Future Phases: Additional 50,000 women
Key Benefits– Financial independence for women- Enhanced financial literacy- Encourages self-reliance and economic growth
‘Vima Sakhi Yojana’ for Women: A New Initiative by the Central Government to Empower Women Financially
The central government has taken another impactful step to make women financially independent. Starting today, the aim of this scheme is to provide job opportunities to women and ensure they have financial resources at hand. Let’s dive into what the ‘Vima Sakhi Yojana’ is all about and how it will benefit women.

Government’s Efforts for Women’s Empowerment
The central government has implemented several schemes to promote women’s economic and social empowerment. In this context, the ‘Vima Sakhi Yojana’ emerges as a new opportunity for women. Through this scheme, women will be provided with employment opportunities, paving the way for their financial independence.

Scheme Inaugurated by Prime Minister Modi
On December 9, during his visit to Haryana, Prime Minister Narendra Modi will officially launch the ‘Vima Sakhi’ scheme. The Life Insurance Corporation of India (LIC), a central government-owned insurance company, will be responsible for the implementation of this initiative.

Important Conditions of the Scheme
To participate in the ‘Vima Sakhi Yojana,’ women must meet the following eligibility criteria:
Minimum Education: Women must have passed at least the 10th standard.
Age Limit: Applicants must be at least 18 years old.
Women who fulfill these conditions will be given training over the next three years. During this training period, they will also receive a stipend (monthly honorarium).

Key Highlights of the Scheme
Three-Year Training Program:
Women will receive in-depth training for three years under this scheme. Upon completing the training, they will have the opportunity to work as insurance agents with LIC. Additionally, graduate women will be eligible to work as Development Officers.
Stipend and Commission:
During the training, women will receive a monthly stipend.
In the first year, they will be paid ₹7,000 per month.
In the second year, the amount will be ₹6,000 per month.
In the third year, the stipend will be ₹5,000 per month.
Furthermore, women achieving their targets as insurance agents will earn additional money in the form of commissions.

New Employment Opportunities
In the first phase of the ‘Vima Sakhi’ scheme, 35,000 women will be given the opportunity to work as insurance agents. In the subsequent phases, an additional 50,000 women will be brought under the scheme. By the end of the three-year training period, the government aims to make these women self-reliant.

An Opportunity for Women to Become Self-Reliant
The ‘Vima Sakhi Yojana’ is not limited to merely providing jobs but will also promote financial literacy among women. This will guide them toward building a secure and independent future.
This initiative by the central government has the potential to bring positive changes in the lives of women. Now, sisters, wives, mothers, or friends in your household can participate in this scheme and achieve financial independence. Share this information with them and encourage them to become ‘Vima Sakhis’!
माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना येथून पाठवा
WhatsApp Group जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment