Farmer Id Online Apply १५ एप्रिलपासून राज्य सरकारने शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी सक्तीचा केला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सीएससी केंद्रांमध्ये एकच गर्दी झाली होती. पण आता सरकारने मोठा दिलासा दिला आहे – शेतकरी आता आपला फार्मर आयडी घरबसल्या, मोबाईलवरच नोंदवू शकणार आहेत!
राज्यातील १ कोटी १४ लाख शेतकऱ्यांना हवी फार्मर आयडी
सध्या महाराष्ट्रात सुमारे १ कोटी १४ लाख शेतकरी सातबारा धारक आहेत, आणि प्रत्येकाने फार्मर आयडी मिळवणे आवश्यक आहे. आतापर्यंत ९० लाख शेतकऱ्यांनी आपली नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे, पण अजूनही सुमारे २४ लाख शेतकरी उर्वरित आहेत. त्यांच्यासाठी आता ऑनलाईन पद्धत सोयीस्कर ठरणार आहे.
Farmer Self Registration साठी पद्धत
जर तुम्ही शेतकरी असाल आणि स्वतःचा Farmer ID तयार करायचा असेल, तर खाली दिलेली सोपी पद्धत वापरा:
- नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ mhfr.agrstack.gov.in वर जावे लागेल. ही प्रक्रिया मोबाईल अॅप किंवा वेब पोर्टलवर सहज करता येते.
- लिंक उघडल्यानंतर “Farmer” या ऑप्शनवर क्लिक करा.
- नंतर “Create New User Account” निवडा.
- तुमचं Aadhaar E-KYC प्रक्रिया पूर्ण करा.
- त्यानंतर, आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
- “Verify” बटणावर क्लिक करा.
- तुमची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. येथे Agristack Portal साठी ज्या मोबाईल नंबरचा वापर करायचा आहे तो लिहा.
- पुन्हा एकदा त्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून Mobile Verification पूर्ण करा.
- आता तुम्हाला Agristack Profile साठी एक पासवर्ड सेट करायचा आहे.
- Set Password आणि Confirm Password भरून पुढे जा.
- नंतर “Create My Account” या बटणावर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर प्रोफाइल तयार होईल. एक OK मेसेज येईल.
- OK केल्यानंतर तुम्हाला परत Login Page दिसेल.
- येथे Username म्हणून तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
- नंतर “Register as Farmer” या पर्यायावर क्लिक करा.
- Mobile Confirmation मध्ये जर मोबाईल नंबर बदलायचा नसेल तर “No” वर क्लिक करा.
- यानंतर Farmer ID Form ओपन होईल.
- शेवटी Farmer Details मध्ये तुमचं पूर्ण नाव आणि इतर सर्व आवश्यक माहिती भरून सबमिट करा.
- अर्ध्या तासात आपला फार्मर आयडी तयार होईल.
ही प्रक्रिया एकदम सोपी आणि सोयीस्कर आहे. घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत रजिस्ट्रेशन करता येईल!
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
आता शेतकऱ्यांना फार्मर आयडीसाठी सीएससी केंद्रांमध्ये रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घरबसल्या स्मार्टफोनवर ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, त्यामुळे वेळ व श्रम वाचणार आहेत.
राहुल मोरे, तहसीलदार महसूल, यवतमाळ यांनीही याबाबत माहिती दिली आहे की ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.