viral video सध्या सोशल मीडियावर एक चक्रावून टाकणारा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. यात एक विद्यार्थिनी थेट तिच्या शिक्षिकेवर हल्ला करताना दिसते.
विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं नेहमीच विश्वासाचं आणि सन्मानाचं असतं. पण या घटनेने सर्वांनाच हादरवलंय. आंध्र प्रदेशमधील रघु इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. झालं असं की, शिक्षिकेने विद्यार्थिनीचा मोबाईल काढून घेतला. या गोष्टीचा विद्यार्थिनीला एवढा राग आला की, तिने थेट चप्पल काढून शिक्षिकेवर हल्ला चढवला.
व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला दिसतं की, शिक्षिका आणि विद्यार्थिनीमध्ये तंटा सुरू आहे. वाद वाढतच जातो आणि विद्यार्थिनी मोठमोठ्याने ओरडायला लागते, हाताने बोट दाखवत धमक्या देऊ लागते. काही क्षणांतच ती तिची चप्पल काढते आणि शिक्षिकेला मारहाण करायला सुरुवात करते.
Student beats teacher with slipper
— Petricia_Journalist (@GodlaPetricia) April 22, 2025
Vijaynagaram A student got into an argument with a teacher at Raghu Engineering College after a teacher took a student's phone.
Argument between the 2 escalated, the student beat the teacher while cursing to give back phone or pay 12000. pic.twitter.com/yLquw0yMFj
परिस्थिती इतकी बिघडते की, शिक्षिकेला स्वतःचा बचाव करावा लागतो, पण तरीही तिला अनेक वेळा मार सहन करावा लागतो. हा धक्कादायक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून, कॅप्शनमध्ये “आंध्र प्रदेशातील रघु कॉलेजमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांच्यात वाद” असं म्हटलं आहे.
आतापर्यंत हा व्हिडिओ हजारोंनी पाहिलाय आणि लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.