लाडकी बहीण योजना अपडेट : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता केव्हा येणार, याकडे संपूर्ण राज्यातील महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. काही महिलांना या योजनेअंतर्गत तब्बल ३००० रुपये मिळणार असल्याचे मिडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.
लाडकी बहीण योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र, लवकरच हा रक्कम वाढवून २१०० रुपये होणार असल्याचे समजते. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय अधिकृतपणे मंजूर केला जाण्याची शक्यता आहे.
महिलांना डिसेंबर-जानेवारीचे एकत्र पैसे?
मिडिया रिपोर्टनुसार, महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात एकूण ३००० रुपये दिले जाऊ शकतात. परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
हे पण वाचा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! महिन्याला 7000 रुपये मिळवण्याची संधी, केंद्र सरकारची ‘विमा सखी’ योजना काय आहे? Vima Sakhi Yojana for Women.
फडणवीसांनी दिले अपडेट
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळेल, असे सांगितले होते. मात्र, डिसेंबर महिना संपण्यास आता फक्त काहीच दिवस उरले आहेत, तरीही मंत्रिमंडळाचे खातेवाटप न झाल्यामुळे हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता आहे.
२१०० रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेतील महिलांना पुढील हप्त्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. योजना अंतर्गत २१०० रुपयांचा सुधारित हप्ता कधी पास होईल, याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, महिलांनी मार्चपर्यंत थोडा संयम ठेवावा. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वाढीव रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाईल.
महिलांसाठी आर्थिक आधार
लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या या आर्थिक सहाय्यामुळे हजारो महिलांना थोडा आर्थिक दिलासा मिळतो.
महिलांनी काय करावे?
महिला लाभार्थींनी आपले बँक खाते आणि कागदपत्रे ठेवणे गरजेचे आहे. तसेच अधिकृत घोषणेसाठी सरकारी संकेतस्थळ किंवा अधिकृत माध्यमांवर नजर ठेवावी.
आता पुढील काही दिवसांत सरकारकडून या संदर्भातील अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महिलांनी थोडी प्रतीक्षा करून योजनेचा लाभ घेत राहावा.
Ladki Bahin Yojana update:
Aspect | Details |
---|---|
Current Monthly Assistance | ₹1,500 per month |
Proposed Increase | ₹2,100 per month |
Expected Approval of Increase | March 2025 (During Budget Session) |
Combined Payment Speculation | ₹3,000 (for December and January installments) |
Official Update on Payment | Deputy CM Devendra Fadnavis assured payment soon |
Reason for Delay | Cabinet portfolio allocation pending |
Who Provided Details on Increase | Aditi Tatkare |
When Will the Increased Amount Be Credited? | Post-March 2025, after Budget Session approval |
Purpose of the Scheme | Financial empowerment of women through monthly financial aid |
What Women Should Do | Keep bank accounts and documents updated, check official announcements |
Update on Ladki Bahin Yojana:
Maharashtra Government’s ambitious Ladki Bahin Yojana has drawn the attention of women across the state, with many eagerly waiting for the December month’s installment. Media reports suggest that some beneficiaries under this scheme might receive a hefty amount of ₹3,000.
Key Features of the Ladki Bahin Yojana:
This scheme, aimed at empowering women, has seen millions of applications. Currently, eligible women are provided ₹1,500 per month under the scheme. However, it is expected that this amount will soon increase to ₹2,100. This decision is likely to be officially approved during the Budget Session in March.
Combined Payments for December and January?
According to media reports, there is speculation that women might receive a combined payment for December and January, amounting to ₹3,000 in January. However, no official announcement has been made regarding this as of yet.
Read Also: Good News for Women! Earn ₹7,000 Per Month with the Central Government’s “Vima Sakhi” Scheme.
Update from Devendra Fadnavis:
Two days ago, Deputy Chief Minister Devendra Fadnavis assured during a discussion in the Legislative Council that the December installment would be released soon. However, with only a few days left in December and the cabinet portfolios yet to be allocated, the payment is likely to be delayed.
When Will the ₹2,100 Increased Installment Be Available?
Women under the Ladki Bahin Yojana will need to wait for the revised installment of ₹2,100. Aditi Tatkare has clarified that beneficiaries will need to remain patient until March. After the Budget Session, the increased amount will be credited to the women’s accounts.
Financial Support for Women:
The Ladki Bahin Yojana is an ambitious initiative by the government aimed at financially empowering women. The monthly financial aid under this scheme provides much-needed economic relief to thousands of women.
What Should Women Do?
Beneficiary women must ensure that their bank accounts and documents are in order. Additionally, they should keep an eye on official announcements through government websites or verified channels.
An official announcement from the government on this matter is expected in the coming days. Women are advised to exercise patience and continue availing themselves of the benefits of this scheme.